बेळगाव / प्रतिनिधी
आधार शिक्षण संस्था संचालित बामणे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गोवा येथील डिसीआय फार्मा कंपनीला भेट दिली. या उपक्रमासाठी संस्थेचे प्राचार्य डॉ. सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रा. उदय पाटील यांच्या नियोजनाखाली प्रा.दीपक हरदगट्टी आणि प्रा. सुशांत यांनी पुढाकार घेतला . तसेच ही फार्मा भेट यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रीतम पाटील, प्रा.श्रद्धा पाटील, प्रा. सोनाली पोवार आणि समिना यांनी परिश्रम घेतले.








