• मुला – मुलींच्या चॅम्पियनशिपसह केंद्रात अव्वल

बेळगाव : बेळगुंदी केंद्र पातळीवरील माध्यमिक विभागीय क्रीडा स्पर्धेत बालवीर विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत मुला मुलींच्या चॅम्पियनशिपसह 17 सुवर्णपदक 8 सिल्वर व 4 ब्रॉंझ पदक मिळवत केंद्रात अव्वल येण्याचा मान मिळविला. मुलांमध्ये रितेश संजीवकुमार देसाई या विद्यार्थ्याने 100 मीटर व 200 मीटर धावणे प्रथम भालाफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळवत चॅम्पियनशिप मिळविली. तर स्नेहल कृष्णा पाटील या विद्यार्थिनीने 400 मीटर धावणे प्रथम, लांब उडी प्रथम, अडथळा शर्यत प्रथम क्रमांक मिळवत मुलींमध्ये चॅम्पियनशिप मिळवली. या क्रीडा महोत्सवात बालवीर विद्यानिकेतनच्या खेळाडूंनी आणि संघानी मिळवलेले यश पुढील प्रमाणे वैयक्तिक मुली – अक्षरा धों. गुरव 100 मीटर धावणे प्रथम ,श्रद्धा नाकाडी 200 मीटर धावणे प्रथम, अदिती पाटील लांब उडी तृतीय क्रमांक.

सांघिक खेळ मुलींच्या रिले(4×100) संघाने प्रथम, कबड्डी द्वितीय क्रमांक वैयक्तिक मुले – समर्थ बाळेकुंद्री 200 मीटर धावणे द्वितीय, लांब उडी प्रथम, तिहेरी उडी प्रथम, भरत भ. पाटील 400 मीटर धावणे प्रथम, 1500 मीटर धावणे प्रथम, समर्थ अष्टेकर अडथळा शर्यत प्रथम, विनायक जयवंत पाटील पाच किलोमीटर चालणे द्वितीय, उंच उडी तृतीय, रणवीर गावडा भालाफेक द्वितीय, सांघिक खेळ रिले(4×100) प्रथम, खो-खो प्रथम, थ्रो बॉल प्रथम,व्हॉलीबॉल द्वितीय क्रमांक या सर्व विद्यार्थ्यांना बालवीर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष, संयोजक, सर्व पदाधिकारी, माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील,प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर यांचे प्रोत्साहन मिळाले व क्रीडा शिक्षक गोविंद गावडे यांचे मार्गदर्शन मिळाले.