बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हात उचलल्याने नाराज झालेले धारवाडचे एएसपी नारायण बरमणी यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी सरकारकडे अर्ज केल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. समजावण्यामुळे नारायण बरमणी काहीसे शांत झाल्याचे सांगितले जाते. पण ते झालेल्या अपमानामुळे दुखावले गेले. म्हणूनच त्यांनी कामावरून स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. या निर्णयामुळे सरकारला आता मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार अशी चर्चा सध्या सुरु आहे.