बेळगाव / प्रतिनिधी

प्राईम टायकून मीडिया यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार २०२६ सोहळा कोल्हापूर येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजक व व्यावसायिकांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमात बेळगावच्या आशा पत्रावळी यांना हस्तनिर्मित व क्राफ्ट उद्योगातील महिला उद्योजक या श्रेणीत महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते हा पुरस्कार आशा पत्रावळी यांनी स्वीकारला.

लोकरीचे विणकाम, आकर्षक स्वेटर डिझाइन तसेच सर्जनशील लेखन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. हस्तनिर्मित निटवेअर निर्मितीतील गुणवत्ता, सातत्यपूर्ण मेहनत आणि महिला उद्योजक म्हणून केलेली प्रेरणादायी वाटचाल यामुळे त्या अनेकांसाठी आदर्श ठरत आहेत.

या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन निलेश साबे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. यावेळी आरती गंडलेवार, प्रथम पटेल, आदित्य मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.