बेळगाव / प्रतिनिधी
मंडोळी रोड येथील जोशीज सेंट्रल पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला होता. १०० मी. आणि ४०० मीटर दौड, तसेच रिले, कबड्डी – खोखो, आणि इतर क्रीडा प्रकारांमध्ये चमकदार कामगिरी केली त्यांना शालेय शिक्षक वर्गाचे प्रोत्साहन लाभले. क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षण संस्थेचे संस्थापक रवी जोशी, प्राचार्या आर.आर. जोशी यांच्या संयोजनाखाली क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. क्रीडा प्रशिक्षक अशोक सामंत यांच्या नेतृत्वाखाली शालेय शिक्षक वर्गाच्या पुढाकाराने स्पर्धा यशस्वी झाल्या.








