बेळगाव / प्रतिनिधी

एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी एका कारवाईत, एपीएमसी मार्केट यार्ड बसस्थानकाजवळ सार्वजनिक ठिकाणी रोख रकमेचा पणाला लावून अंदर बहार’ नावाचा जुगार खेळणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. आर. मुत्तत्ती आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकून विनायक सोनरवाडी, सिद्धार्थ नागानूर, शिवानंद उगरखोडा, राजेंद्र सुतार आणि दशरथ पाटील या आरोपींना अटक केली.

या आरोपींकडून २०,१००/- रुपये रोख रक्कम आणि पत्त्यांची कॅट जप्त करण्यात आली आहे.. आरोपींविरुद्ध एपीएमसी पोलीस ठाण्यात कर्नाटक पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या दोन्ही यशस्वी कारवाया करणाऱ्या पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याची पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांनी प्रशंसा केली आहे.