बेळगाव / प्रतिनिधी
मिशन ऑलिम्पिक गेम असोसिएशनतर्फे रविवार दि. ८ महिला दिनानिमित्त आनंदवाडी आखाड्यात महिला कुस्ती मैदान भरविण्यात आले आहे. या मैदानात कर्नाटक व महाराष्ट्रातील नामवंत महिला मल्ल सहभागी होणार असून एकूण ६० हून अधिक कुस्त्या होणार आहेत. महिलांच्या कुस्तीत महाराष्ट्र चॅम्पियन प्रीतम दाभाडे पुणे वि. कर्नाटक चॅम्पियन सुजाता हल्याळ, प्रांजल तुळजाई बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेल वि. रिंकु नलवडे पुणे, खुशी खादरवाडी वि. ऋतुजा रावळ शहापूर, भक्ती गावडा मोदेकोप वि. रिया बस्तवाड, शृती खादरवाडी वि. प्रणोती पाटील कोल्हापूर, सुषमा शिंदे खादरवाडी वि. सई किल्लेकर मजगाव, समिधा बिर्जे वडगाव वि. प्रीतम हुले पुणे अशा १५ हून अधिक लढती होणार आहेत.
पुरुषांच्या कुस्तीत प्रथम क्रमांकांची लढत महाराष्ट्र चॅम्पियन बाळू अपराध वि. हरियाणा केसरी हरिषकुमार यांच्यात होणार आहे. द्वितीय कुस्ती कर्नाटक कंठीरेवा कामेश पाटील कंग्राळी वि. आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता हितेश पाटील (पुणे), तृतीय कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन दिग्विजय जाधव वि. कर्नाटक चॅम्पियन प्रेम जाधव, चौथी कुस्ती पार्थ पाटील कंग्राळी वि. बबलू नरळे सातारा, पाचवी कुस्ती प्रथमेश हट्टीकर कंग्राळी वि. धीरज पाटील (पुणे), सहावी कुस्ती कार्तिक इंगळगी वि. पृथ्वीराज पाटील कंग्राळी यांच्यात रंगणार आहे. पुरुष विभागात आकर्षक कुस्ती श्रेयस हट्टीकर वि गगन अलावाड यांच्यात तर महिलांच्या विभागात प्रभा खादरवाडी वि. कल्याणी अंबोळकर, प्रांजल बिर्जे वि. रिया बेळगाव यांच्यात होतील. आखाड्यातील पहिली कुस्ती साई गावडे मुचंडी वि. सम्राट पाटील बेनकनहळ्ळी, राजवीर पाटील मंडोळी वि. शेखर खादरवाडी यांच्यात होणार आहे. कुस्ती शौकीनांनी याचा लाभघ्यावा, असे संघटनेचे अध्यक्ष अतुल शिरोळे यांनी कळविले आहे.








