• पंजाब केसरी गुरुजीत सिंगला घुटना डावावर केले चीत

बेळगाव / प्रतिनिधी

आनंदवाडीच्या प्रसिद्ध कुस्ती आखाड्यात मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत जंगी कुस्ती मैदानात कंग्राळीच्या प्रेम जाधव याने अवघ्या चौथ्या मिनिटात पंजाब केसरी गुरुजीत सिंग याला घुटना डावावर चीत करत आनंदवाडी कुस्ती मैदान मारले.
मान्यवरांच्या उपस्थितीत आखाड्यात पहिलं क्रमांकाची कुस्ती लावण्यात आली. यामध्ये प्रेम जाधव व गुरुजीत सिंग यांच्यात प्रारंभी पासूनच आक्रमक खेळ पाहायला मिळाला. प्रेम जाधवने आपल्या ताकतीच्या जोरावर गुरुजीतला अवघ्या चौथ्या मिनिटाला घुटना डावावर चित करत उपस्थित कुस्ती प्रेमींची दाद मिळवली. या कुस्ती मैदानात महिला कुस्तीनांही उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. आकर्षक महिला कुस्तीतील प्रथम क्रमांकाची कुस्ती भक्ती पाटील कंग्राळी हिने राधिका बैलूरकर हिला झोळी डावावर चित केले.द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत ऋतुजा रावळ हिने खुशी पाटील हिला गुणावर चित केले.