बेळगाव : येथील अभिजात मराठी संस्थेच्या वतीने यंदा मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने “वाचक महोत्सवाचे ” आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता हिंदवाडी येथील गुरुदेव रानडे मंदिराच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात दहाहून अधिक वाचक “आपल्याला आवडलेले पुस्तक” या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. चैतन्य हलगेकर हे राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याचे अध्यक्ष डॉ सध्या देशपांडे व कार्यवाह अनंत लाड यांनी कळविले आहे.