- महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने आयोजन
बेळगाव / प्रतिनिधी
अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने शनिवारी, ४ ऑक्टोबर २०२५ रोजी लोकमान्य रंगमंदिर, कोनवाळ गल्ली, बेळगाव येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेमागील उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व्यासपीठावर बोलण्याचे धैर्य वाढवणे, आत्मविश्वास वृद्धिंगत करणे तसेच वक्तृत्वकलेचा विकास करणे हा आहे. विद्यार्थी आपले विचार प्रभावीपणे मांडू शकावेत यासाठी ही स्पर्धा तीन गटांत घेण्यात येणार आहे : प्राथमिक (४ थी – ७ वी), माध्यमिक (८ वी – १० वी) व महाविद्यालयीन (११ वी ते पदव्युत्तर).
खालील गटांमधील ४ पैकी एका विषयात विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
प्राथमिक गट :
- मोबाईल – बालपणाचा शत्रू की मित्र?
- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम – व्यक्तिमत्त्व व विचार
- मराठी भाषेचे संवर्धन – माझी जबाबदारी
- शालेय जीवनातील खेळाचे महत्त्व
माध्यमिक गट :
- युवकांमध्ये वाढती व्यसनाधिनता
- सोशल मीडियाचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम
- अभिजात मराठी भाषा – आगामी आव्हाने
- स्वतंत्र भारताच्या घडणीत सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान
महाविद्यालयीन गट :
- लोकशाही की एकाधिकारशाही?
- ‘व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी’ – इतिहासाचे विकृतीकरण
- युवा पिढीचा वैज्ञानिक दृष्टिकोन
- अभिजात मराठी भाषा – भविष्यातील आव्हाने
बक्षिसाचे स्वरूप : प्रत्येक गटातील विजेत्यांना प्रमाणपत्र, मानचिन्ह व रोखरक्कम प्रदान केली जाणार आहे.
इच्छुक स्पर्धकांनी शुक्रवार, ३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत युवा समिती कार्यालय, टिळकवाडी, बेळगाव येथे किंवा खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून नोंदणी करावी. प्रत्येक गटातील पहिल्या ३० स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाईल.
- संपर्क : श्रीकांत कदम – 7019668025 , प्रतीक पाटील – 7338145673
- अधिक माहितीसाठी : अध्यक्ष , अंकुश केसरकर – 9739963229 (महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव)