बेळगाव : बेंगळूरमध्ये सुरू असलेल्या ४१ व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आरोही चित्रगारने १०० मिटर बटरफ्लाय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करताना रौप्य पदक पटकाविले. तिने सकाळी झालेल्या हिट्स मध्ये १.१३ सेकंदाची वेळ नोंदवली होती. संध्याकाळी झालेल्या फायनान्स मध्ये तिने आपल्या स्पीड मध्ये सुधारणा करून १.११ सेकंदाची वेळ नोंदवून हे पदक संपादन केले. आरोही ही आबा व हिंद क्लबची जलतरणपटू असून सध्या ती ओरिसाच्या जेएसडब्ल्यू अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे .तिला आबा हिंद क्लबचे जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार तसेच वडील शशिकांत चित्रगार यांचे प्रोत्साहन लाभते.
December 9, 2025
बेळगाव शहराच्या दोन्ही भागात युनिट : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून सुमारे ५६०० […]








