- शहरातील कॉलेजमध्ये रॅगिंग विरोधी पथकाची स्थापना करण्याची मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे त्यानिमित्ताने शहरातील सर्व महाविद्यालयात रॅगिंग विरोधी पथक स्थापन करा अशी मागणी आम आदमी पार्टी कडून करण्यात आली आहे. शनिवारी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना निवेदन देत आपच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्हा आपचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात रॅगिंग ही कॉलेजला जाणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची बाब असून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी गंभीर आणि चिंतेचा विषय बनला आहे यावर मात करण्यासाठी सक्रिय पोलिसांची गरज आहे असे निवेदनात म्हणण्यात आले आहे.
बेळगाव शहरातील पोलीस अधिकाऱ्यांनी रॅगिंग रोखण्यासाठी महाविद्यालयांमध्ये नियमित भेटी द्याव्यात याशिवाय पोलिस आणि महाविद्यालयीन प्रशासन यांचा समावेश असलेले अधिकृत रॅगिंग विरोधी कृतीदल स्थापन करावे. शहरातील सर्व कॉलेजला रॅगिंग विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आणि तक्रारीवर तातडीने कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस अधिकाऱ्यांनी द्यावेत अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. बेळगाव शहरातील सर्व कॉलेजमधून रॅगिंग नमुक्त वातावरण सुरक्षित करण्यासाठी योग्य पावले उचलले जातील असे आश्वासन पोलीस आयुक्त बोरसे यांनी यावेळी दिले.