- एकाला अटक ; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरात गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर दारूबंदी जाहीर करण्यात आल्याने, गोव्यातून बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक केली जात होती. याचवेळी उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत ५० बॉक्स दारूसह एक कार आणि दुचाकी जप्त करून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर त्याचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
बेळगाव तालुक्यातल्या राकसकोप गावाजवळ ही कारवाई करण्यात आली. याबाबत प्राप्त माहितीनुसार, उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेळगाव शहराच्या दिशेने येणाऱ्या एका कारला अडवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी, कारमधील दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले, तर तिसऱ्या आरोपीला अधिकाऱ्यांनी पकडले. बाळू सातेरी (रा. बहाद्दरवाडी ता. बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी बेळगाव उत्पादन शुल्क पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.