बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली येथील ‘बेळगावचा राजा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक गणेश मूर्तीची जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी महाआरती केली.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी, गणेशोत्सव हा तरुणांसाठी आणि नागरिकांसाठी एकता, भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव आहे, असे सांगितले. त्यांनी सर्व नागरिकांना शांतता आणि सलोख्याने हा सण साजरा करण्याचे आवाहन केले.
या सोहळ्याला मंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, तसेच प्रताप मोहिते, विश्वजित हसबे, सुनील जाधव, दिगंबर पवार, प्रज्वल पाटील, प्रवीण धामणेकर, उत्तम नाकाडी, श्रीनाथ पवार, विनायक पवार, अभिषेक नायक, सत्यम नायक, वृषभ मोहिते, भरत काळगे, अनंत बामणे, रोहन जाधव, सौरभ पवार, हर्षल नायक, महिंदर पवार, निखिल पाटील, संदीप कामुले, राहुल जाधव, संजय रेडेकर आणि उमेश मेणसे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.