• माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर, श्री. आर. एम. चौगुले यांची प्रमुख उपस्थिती

सुळगा (हिं.) / वार्ताहर

बेनकनहळ्ळी (ता. बेळगाव) येथील संभाजी महाराज युवक मंडळाच्या सार्वजनिक गणपतीची महाआरती रविवार दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झाली. खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर तसेच तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष श्री.आर. एम. चौगुले यांच्याहस्ते विधिवत पूजन करून महाआरती करण्यात आली. यावेळी “गणपती बाप्पा मोरया” गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. 

याप्रसंगी मंडळाच्यावतीने डॉ. अंजलीताई निंबाळकर आणि श्री. आर. एम. चौगुले यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यानंतर मनोगत व्यक्त करताना डॉ. अंजलीताई निंबाळकर आणि श्री. आर. एम. चौगुले यांनी सर्वांना गणेशोत्सावाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच महाआरतीला निमंत्रण देऊन केलेल्या सत्काराबद्दल मंडळाचे आभार मानले.

यावेळी बेनकनहळ्ळी देवस्की पंच कमिटी, सामाजिक कार्यकर्ते सुनील आवडण, सुनील झंगरूचे, सुरेश राजूकर, रोहित देसूरकर, नारायण डोळेकर, नागेश देसूरकर, लक्ष्मण पाटील, नारायण कालकुंद्रीकर, सुनील खांडेकर आदी उपस्थित होते.