उचगाव / वार्ताहर
शिवज्योत युवक मंडळ गणपत गल्ली उचगावच्या वतीने यावर्षीच्या रौप्य महोत्सवी उचगावचा राजा श्रीमूर्तीचा आगमन सोहळा उत्साहाने साजरा करण्यात आला. वेशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्री गणेश आगमन सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी उचगाव ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे होते. शिवपुतळ्याचे पूजन म. ए. समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले आणि भाजप नेते विनय कदम तसेच बाळकृष्ण तेरसे यांच्याहस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन काँग्रेस ते जयवंत बाळेकुंद्री, एल. डी. चौगुले, आंबेवाडी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष चेतन पाटील, माजी सदस्य रामा कदम, संभाजी कदम, जावेद जमादार, बंडू पाटील, गजानन बांदिवडेकर, इराप्पा पावशे आदींच्या हस्ते झाले.
प्रमुख पाहुणे म्हणून मल्लाप्पा मेणसे, मनोहर कदम, अशोक गोपाळ पावशे, डॉ. प्रताप पावशे, कृष्णा होनगेकर, विठ्ठल मेणसे, पुंडलिक पावशे, पवन देसाई उपस्थित होते. गणेश मूर्तीचे पूजन करुन आगमन सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
ढोल-ताशा आणि झांज पथक, महिलांची लेझीम आणि योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. आर. एम. चौगुले म्हणाले, शिवज्योत मंडळाने सामाजिक बांधिलकी राखली असून प्रत्येक कार्यात हे मंडळ अग्रेसर आहे. मंडळाने अनेक समाजपयोगी कामे राबवली आहेत. सूत्रसंचालन एन. ओ. चौगुले यांनी केले, तर आभार मंडळाचे अध्यक्ष बाबाजी पावशे यांनी मानले.

