बेळगाव : इंद्रप्रस्थनगर येथील रहिवासी आनंद नरसिंह माळी सर (वय ८६) यांचे आज मंगळवारी सकाळी निधन झाले. गोवा, बेळगुंदी येथे त्यांनी शिक्षक म्हणून सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, तीन विवाहित मुलगे, एक मुलगी, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. आज दुपारी १ वा. हिंदवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचा जनसंपर्क मोठा होता. शांत, प्रेमळ स्वभाव असल्याने विविध सामाजिक संस्थांतून ते कार्यरत होते.