चंदगड / प्रतिनिधी
स्वामी प्रतिष्ठानचा चंदगड येथे उद्या बुधवार दि. २० ऑगस्ट रोजी आयोजित केलेला दहीहंडी उत्सव तात्पुरता पुढे ढकलण्यात आला आहे. चंदगडसह राज्यभर होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी नद्यांवरील पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. यासर्व परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असून उत्सवाची पुढील तारीख निश्चित होताच सर्वांना कळविण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आमदार श्री. शिवाजीराव पाटील यांनी कळविले आहे.