बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शाळा महाविद्यालयांच्या सुट्टीत आणखी एक दिवसाची वाढ केली आहे. त्यामुळे उद्या बुधवार दि. २० ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील शाळा, महाविद्यालये आणि पदवी पूर्व महाविद्यालये बंद राहणार आहेत. 

सदर आदेशाचे उपसंचालक सार्वजनिक शिक्षण खाते बेळगाव आणि चिक्कोडी, उपसंचालक पदवीपूर्व शिक्षण खाते बेळगाव आणि चिक्कोडी, तसेच उपसंचालक महिला व बालकल्याण खाते बेळगाव यांनी काटेकोर अंमलबजावणी करावी असे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. एकंदर काल सोमवार, आज मंगळवार नंतर आता उद्या बुधवारी शाळांना सुट्टी असणार आहे.