बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उद्या मंगळवार दि. १९ ऑगस्ट रोजी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, बेळगाव, बैलहोंगल, कित्तूर, खानापूर, रामदुर्ग, सौंदत्ती, चिकोडी आणि हुक्केरी या सर्व तालुक्यांमधील अंगणवाड्या, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना तसेच पूर्व-विद्यापीठ महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.