बेळगाव / प्रतिनिधी

पश्चिम घाट, बेळगाव शहर आणि तालुका परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोमवार दि. १८ रोजी सर्व शाळांना तसेच पदवी पूर्व कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे . जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी याबाबतची सूचना प्रसिद्धीस दिली आहे. बेळगाव शहर, ग्रामीण विभाग, खानापूर, सौंदत्ती, बैलहोंगल आणि कित्तूर तालुक्यासाठी हा आदेश लागू असल्याचे म्हटले आहे.