बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावहून मुंबईला जाणारे स्टार एअरचे सकाळचे विमान काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रोखण्यात आले. मात्र हे इमर्जन्सी लँडिंग नसल्याचे स्पष्टीकरण विमानतळ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. या विमानात एकूण ४८ प्रवासी बेळगाव ते मुंबई प्रवास करणार होते. मात्र विमान काही कारणामुळे स्थगित करण्यात आले. या विमान प्रवाशांसाठी स्टार एअर कंपनीने दुपारी दुसऱ्या विमानाची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र प्रवाशांना काही काळासाठी प्रतीक्षा करावी लागली. यामध्ये कोणताही धास्तीचा प्रकार नव्हता. केवळ तांत्रिक बिघाड होता अशी माहिती देण्यात आली.