• महापालिकेच्या विभागीय कार्यालयांना भेट देऊन केली कामकाजाची पाहणी

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव महापालिका आयुक्तांनी आज सकाळी महापालिकेच्या विभागीय कार्यालयांना अचानक भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. बेळगाव महापालिकेच्या आयुक्त शुभा बी. यांनी आज शहराची पाहणी केली. यावेळी त्यांनी गणपत गल्ली नरगुंदकरभावे चौक येथील बेळगाव महापालिकेच्या विभागीय कार्यालयाला भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या कामाचा आणि उपस्थितीचा आढावा घेतला.

यानंतर अर्बन बँकेसमोरील कार्यालयालाही त्यांनी भेट दिली. तसेच महापालिकेच्या शववाहिकेची पाहणी केली. याप्रसंगी कर्मचाऱ्यांना जनतेची सेवा करण्याचे निर्देश दिले त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ऐकल्या.