बेळगाव : बेंगळूरमध्ये सुरू असलेल्या ४१ व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आरोही चित्रगारने १०० मिटर बटरफ्लाय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करताना रौप्य पदक पटकाविले. तिने सकाळी झालेल्या हिट्स मध्ये १.१३ सेकंदाची वेळ नोंदवली होती. संध्याकाळी झालेल्या फायनान्स मध्ये तिने आपल्या स्पीड मध्ये सुधारणा करून १.११ सेकंदाची वेळ नोंदवून हे पदक संपादन केले. आरोही ही आबा व हिंद क्लबची जलतरणपटू असून सध्या ती ओरिसाच्या जेएसडब्ल्यू अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे .तिला आबा हिंद क्लबचे जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार तसेच वडील शशिकांत चित्रगार यांचे प्रोत्साहन लाभते.
October 19, 2025
दिवाळी २०२५ : हिंदू धर्मियांच्या प्रमुख सणांपैकी एक असलेल्या दिवाळीला प्रारंभ झाला आहे. दिवाळीत विविध धार्मिक सणांना तर महत्त्व असतेच पण त्याचबरोबर आणखी एक प्रथा दिवाळीत […]