बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दिनांक २७ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज)येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. तरी या बैठकीला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले आहे.