- शाळेतून मुलांना घरी घेऊन जात असताना काळाचा घाला
बेळगाव / प्रतिनिधी
गोवावेस सिग्नलजवळ भरदुपारी झालेल्या एका भीषण अपघातात पादचारी महिलेचा मृत्यू झाला. शिबा वासिम इनामदार (वय ३२, रा. बाबले गल्ली, अनगोळ) असे मृत महिलेचे नाव आहे. आपल्या दोन मुलांना शाळेतून घरी घेऊन जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघात होताच महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोवावेस सर्कलजवळ दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बेळगाव शहरात सिग्नल वर भर शहरात वाहनावरील गाड्यांच्या वेगावर नियंत्रण हवे अशी मागणी वाढू लागली आहे.