बेळगाव / प्रतिनिधी
वडगाव येथे दि. २२ जुलै पासून सुरु होणाऱ्या श्री मंगाईदेवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी शुक्रवारी रात्री मंदिराला भेट देऊन पाहणी केली.
बेळगावमध्ये होणाऱ्या सर्व मोठ्या यात्रांपैकी एक असलेली ही यात्रा दि. २२ जुलै पासून १० दिवसांसाठी भरणार आहे. या पार्श्वभूमीवर देवीचे सुलभ दर्शन आणि गर्दी नियंत्रित करण्यासाठी उचललेल्या खबरदरीचा आढावा घेऊन यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी त्यांनी विविध सुचना केल्या. शहापूर विभागात घरोघरी पोलिस उपक्रमाच्या उद्घाटना दरम्यान वडगाव श्री मंगाईदेवी यात्रेचा उल्लेख झाल्यानंतर पोलिस आयुक्तांनी तातडीने कारवाई केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.