बेळगाव / प्रतिनिधी
मंडोळी रोड येथील जोशीज सेंट्रल पब्लिक स्कूलमधील सहावीच्या इयत्तेतील विद्यार्थी दर्शन सुतारने कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. दि. १३ जुलै रोजी गदग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर येथे शाईन स्पोर्ट्स कराटे अकादमीने आयोजित केलेल्या ९ व्या राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. दर्शनने ११ वर्षाखालील वयोगटातील गटात, रौप्यपदक आणि कांस्य पदक दोन्ही मिळवले, तसेच ट्रॉफीही मिळवली. प्राचार्या आर. आर. जोशी आणि अरुण जाधव यांनी त्याला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आणि त्याचे अभिनंदन केले.