बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीने सय्यद गल्ली, न्यू गांधीनगर बेळगाव येथील मुख्तार इनामदार यांची बेळगाव ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे नुतन सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.

केपीसीसी अध्यक्ष व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या शिफारसी वरून ही नियुक्ती करण्यात आली असल्याचे कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आपण यशस्वीरित्या पार पाडाल. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि स्थानिक नेत्यांच्या सहकार्याने काँग्रेस पक्षाची धोरण आणि कार्यक्रम प्रभावीपणे राबवून पक्ष संघटना अधिक संघटित आणि मजबूत करावी. त्याचप्रमाणे जिल्हा आणि ब्लॉक काँग्रेस समितीच्या सहकार्याने कार्यरत रहावे, अशा सदिच्छा पत्रकाद्वारे व्यक्त करण्यात आल्या आहेत.