विजयपूर / दिपक शिंत्रे
विजयपूर जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने दि. १९ जुलै रोजी जिल्ह्यातील पत्रकारांच्या मुलांना प्रतिभा पुरस्कार, वार्षिक पुरस्कार प्रदान समारंभ आणि पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री शिवानंद पाटील, मुख्यमंत्री यांचे माध्यम सल्लागार के. व्ही. प्रभाकर , कर्नाटक राज्य पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष शिवानंद तगडूर आणि मुख्य कार्यवाह जी. सी. लोकेश यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
जिल्ह्याचे मुख्य सचिव मोहन कुलकर्णी, राज्य कार्यकारी समितीचे नामनिर्देशित सदस्य के.के. कुलकर्णी आणि जिल्हा खजिनदार राहुल आपटे यांनी बेंगळुरूला जाऊन या पाहुण्यांना आमंत्रण दिले. यासर्व मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आश्वासन दिल्याचे मोहन कुलकर्णी यांनी सांगितले.