बेळगाव : येथील श्री बसवेश्वर सहकारी बँकेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक तसेच रविवार पेठेतील तेल व्यापारी श्री. बसवराज विरुपक्षप्पा झोंड (वय ६८ वर्षे) यांचे बुधवार दि. ९ जुलै रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी कलमठ रुद्रभूमी, सदाशिवनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी , सुना, जावई व भावंडे असा परिवार आहे.
बसवेश्वर बँकेच्या चेअरमन पदाची धुरा त्यांच्या वडिलांनीही सांभाळली होती. तसेच बसवेश्वर बँकेवर ते तीन वेळा संचालक म्हणून निवडून आले होते. त्यांच्या निधनाने एका ज्येष्ठ समाजसेवकाचा अंत झाला आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.