- कल्लेहोळ येथील गोपाळ नेमाणी पाटील यांचा स्तुत्य उपक्रम
सुळगा (हिं.) / वार्ताहर
कल्लेहोळ (ता. बेळगाव) येथील प्रतिष्ठित नागरिक तथा शिक्षणप्रेमी पालक श्री. गोपाळ नेमाणी पाटील यांनी ‘रुतिका’ आणि ‘रुतुजा’ या स्वतःच्या जुळ्या मुलींचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. वादविसानिमित्त करण्यात येणाऱ्या इतर खर्चाला फाटा देत कल्लेहोळ प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी वह्यांचे वाटप केले. याबद्दल शाळेच्यावतीने मुख्याध्यापकांनी त्यांचे आभार मानले. यावेळी शाळेतील शिक्षक – शिक्षिका यांच्यासह इयत्ता पहिलीचे विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.