बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्यातील कुडची येथे हवेत गोळीबार आणि रस्त्यावर चाकू घेऊन फिरून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य बाबाजान खुलीमुंडसई यांना अटक करण्यात आली आहे. बाबाजान त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे हा प्रकार उघडकीस झाला आला त्यानंतर तातडीने पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी कुडची पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.