खानापूर / प्रतिनिधी

सध्याच्या पावसाळी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यातील कुसमळी गावाजवळील ब्रिजची आज बुधवारी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली. बेळगाव – जांबोटी मार्गावर कुसमळी येथे नवा ब्रिज बांधण्यात येत आहे. या ब्रिजचे बांधकाम सुरू असल्याने पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र पावसामुळे तो रस्ता वाहून गेला असल्यामुळे आता ऐन पावसाळ्यात हा ब्रिज वाहतुकीसाठी बंद असून या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. अद्यापि कांही काम बाकी असलेल्या सदर ब्रिजला आज बुधवारी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. ब्रिजचे बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले असून येत्या कांही दिवसात तो वाहतुकीसाठी खुला केला जाण्याची शक्यता आहे.