बेळगाव / प्रतिनिधी

क्रॉसड ग्लान्सीस हे पुस्तक नुकतेच फ्रान्समध्ये प्रकाशित झाले असून त्यामध्ये जगभरातील निवडक दहा चित्रकारांची माहिती आणि चित्रे असून त्यामध्ये बेळगावचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार विकास पाटणेकर यांचा समावेश आहे. फ्रान्समधील प्रख्यात प्रकाशन संस्था युलेसेसने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. पेट्रा वॉटर्स यांनी या पुस्तकाचे संपादन केले असून पुस्तक फ्रेंच भाषेत आहे. या पुस्तकात विकास पाटणेकर यांच्या आजवरच्या चित्रकलेच्या योगदानाबद्दल विस्ताराने लिहिण्यात आले आहे. याशवाय विकास यांची निवडक चित्रेही पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे बेळगाव आणि परिसरातील विकास यांनी रेखाटलेली चित्रे आहेत. आता जगभरात विविध ठिकाणी या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.