बेळगाव : कर्नाटक प्रेस क्लबतर्फे बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत अध्यक्ष डॉ. वाय. एम. पाटील यांना कर्नाटक पंचायत आयकॉन पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात केलेल्या कामांची दखल घेऊन हा पुरस्कार दिला जाणार आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्वसामान्यांपर्यंत सरकारी योजना पोचविण्याचे प्रयत्न, गावातील रस्ते, गटारींसहविविध विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग, नरेगा, जलजीवन मिशन अशा अनेक योजना लोकांपर्यंत पोचवणे आणि त्यांच्या पंचायत कार्यक्षेत्रात सर्वांगीण विकासासाठी झोकून देऊन कार्य केल्याबद्दल डॉ. पाटील यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
पुरस्कार वितरण समारंभ गुरुवारी (दि. २४) बंगळूरमधील कन्नड भवनात आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी कॅबिनेट मंत्री, आमदार, चित्रपट अभिनेते आणि इतर मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.







