बेळगाव : हिंदवाडी येथील श्री घुमटमाळ मारुती मंदिर येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त काल व आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
काल रात्री वारकरी संप्रदाय भजनी मंडळाचे भजन झाले. आज पहाटे हनुमान मूर्तीवर शेकडो भक्तांचे अभिषेक झाल्यानंतर पहाटे ५ वाजल्यापासून ह. भ. प. श्री कृष्णमूर्ती बोंगाळे यांचे हनुमान जन्मोत्सवावर प्रवचन झाले. ठीक 6 वाजून 25 मिनिटांनी हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा अनेक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यानंतर महिलांच्या भजनाचे कार्यक्रम झाले. घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट कमिटीच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. दुपारी महाप्रसाद होणार आहे.
December 9, 2025
बेळगाव शहराच्या दोन्ही भागात युनिट : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून सुमारे ५६०० […]








