• अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

विजयपूर / दिपक शिंत्रे

विजयपूर जिल्ह्यातील बसनबागेवाडी शहरातील हुविन हिप्परगी येथील हुलिबेनची क्रॉस जवळ मध्यरात्रीच्या सुमारास कार आणि मोटरसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वारचा जागीच मृत्यू झाला असून अपघातानंतर कारसह कारचालक पळून गेला आहे.
हुलिबेनची गावातील बिरेश सिद्धरामप्पा मुरडी (वय २२) मृत्यू तरुणाचे नाव असून घटनेच्या स्थळी बसनबागेवाडी पोलिस ठाण्याचे पोलिसांनी भेट देऊन तपास करीत आहेत बसनबागेवाडी पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.