• पुण्यातील समारंभात ज्येष्ठ नाट्यकर्मी चंद्रकांत काळे यांच्याहस्ते गौरव

पुणे : उदयोन्मुख गायिका आणि नाट्यकर्मी अनुष्का आपटे यांना २०२६ या वर्षाचा सई भागवत स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि भागवत कुटुंबीयांच्या वतीने आयोजित हा पुरस्कार सोहळा २३ ऑक्टोबर रोजी पुण्यातील श्रीराम लागू रंग अवकाश येथे पार पडला.

ज्येष्ठ नाट्यकर्मी चंद्रकांत काळे यांच्याहस्ते अनुष्का आपटे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. मोहन आगाशे मंचावर उपस्थित होते. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक समर नखाते यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

या पुरस्काराचे स्वरूप १० हजार रुपये रोख रक्कम आणि मानपत्र असे आहे. उदयोन्मुख कलावंतांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराने अनुष्का आपटे यांच्या कलाप्रवासातील योगदानाचा गौरव करण्यात आला.