- बेळगुंदी विभागीय आणि तालुकास्तरीय स्पर्धांत विद्यार्थ्यांची पदकांची कमाई
- श्रीनाथ निलजकरची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
बेळगुंदी : पश्चिम विभाग शिक्षण मंडळ संचलित बिजगर्णी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या बेळगुंदी विभागीय माध्यमिक शालेय क्रीडा स्पर्धांसह तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विविध क्रीडा प्रकारांत यश मिळवत विद्यार्थ्यांनी शाळेचा नावलौकिक वाढविला आहे.
गोळाफेक स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर श्रीनाथ निलजकर याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याने थाळीफेक आणि भालाफेक स्पर्धेतही द्वितीय क्रमांक पटकावला. शाळेच्या मुला-मुलींच्या खो-खो संघांनी तृतीय क्रमांक मिळविला.
- विविध क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांचे यश :
१४ वर्षांखालील मुलांच्या २०० मीटर रिले स्पर्धेत शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. १७ वर्षांखालील मुलींच्या ४०० मीटर रिले स्पर्धेत तृतीय, तर मुलांच्या १०० मीटर रिले स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
वैयक्तिक क्रीडा प्रकारांतही विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. १४ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत कार्तिकी भास्कर हिने द्वितीय क्रमांक मिळविला. लांब उडी स्पर्धेत मिताली मोरे हिने द्वितीय क्रमांक पटकावला, तर १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत दिशा सुतार हिने द्वितीय क्रमांक मिळविला. १७ वर्षांखालील मुलींच्या धावण्याच्या स्पर्धेत ऐश्वर्या अष्टेकर हिने द्वितीय क्रमांक मिळवून यशाची नोंद केली.
या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक अरुण दरेकर आणि मुख्याध्यापक रमेश कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिक्षक, पालक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करून यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.








