• एडीजीपी आर. हितेंद्र यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना कडक सूचना
  • सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश

बेळगाव : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एडीजीपी (कायदा व सुव्यवस्था) आर. हितेंद्र, आयपीएस यांनी गुरुवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विसर्जन कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर योग्य सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील बाबींचा आढावा घेत विसर्जनाचा कार्यक्रम सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यावर बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीला बेळगावचे पोलीस आयुक्त प्रकाश निकम, उत्तर विभागाचे आयजीपी संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. बैठकित गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवरील सुरक्षा आराखड्याचा आढावा घेण्यात आला.