- अथणी – गोकाक मार्गावर कोळीगुड्डजवळ घटना
- जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल
रायबाग : तालुक्यातील कोळीगुड्ड गावाजवळ अथणी-गोकाक मुख्य रस्त्यावर कार आणि दुचाकीची भीषण धडक होऊन दोघे जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये हारुगेरी येथील एका दुचाकीस्वाराचा समावेश आहे.
अपघातानंतर दोन्ही दुचाकीस्वार रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.
हा अपघात हारुगेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला असून, कारचालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे प्राथमिक स्वरूपात सांगण्यात येत आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.







