• ४×१०० मीटर फ्रीस्टाइल रिलेमध्ये पटकावले सुवर्णपदक
  • प्रशिक्षकांसह मान्यवरांचे प्रोत्साहन

बेळगाव : ५५व्या केंद्रीय विद्यालय संघटन (KVS) राष्ट्रीय जलतरण स्पर्धा २०२६ मध्ये बेळगावच्या प्रीतम रेनके याने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले. बंगळुरू येथे आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेत प्रीतमने ४×१०० मीटर फ्रीस्टाइल रिलेमध्ये सुवर्णपदक पटकावले.

प्रीतम हा Swimmers’ Club Belgaum आणि Aquarius Swim Club Belgaum यांच्याशी संबंधित असून, बेळगावातील KLE International Swimming Pool तसेच Suvarna JNMC Olympic Size Swimming Pool येथे तो नियमित सराव करतो.

प्रशिक्षक उमेश काळघटगी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रीतमने ही कामगिरी साध्य केली. तसेच जलतरण प्रशिक्षक अजिंक्य मेंडके, महेश पवार, अक्षय शेरेगार, नितीश कुडुचकर आणि गोवर्धन काकतकर यांचेही त्याला प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले.

सातत्यपूर्ण सरावासोबतच विविध मान्यवरांचे प्रोत्साहन आणि सहकार्यही प्रीतमच्या यशामागे राहिले. KLE Society चे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, जयभारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हुंबरवाडी, Rtn. अविनाश पोतदार, मानेक कपाडिया, लता कित्तूर, सुधीर कुसाने, प्रसाद तेंडोलकर यांच्यासह अनेक हितचिंतकांनी त्याला सातत्याने प्रोत्साहन दिले.

राष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या या सुवर्णपदकामुळे बेळगावच्या जलतरण क्षेत्रात प्रीतम रेनकेच्या यशाची आणखी एक उल्लेखनीय नोंद झाली आहे. त्याच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.