बेळगाव / प्रतिनिधी

फिट इंडिया चळवळीचा एक भाग म्हणून, जोशी सेंट्रल पब्लिक स्कूलने विद्यार्थ्यांमध्ये फिटनेस, शिस्त आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी एका सायकल रॅलीचे यशस्वीपणे आयोजन केले होते .

या रॅलीला आधार शिक्षण संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक, डॉ. रोहित बामणे आणि प्राचार्य डॉ. अरुण जाधव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. सहभागींना प्रोत्साहन देण्यासाठी अशोक सावंत, ए. डी. धामणेकर यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ही रॅली शाळेच्या आवारातून सुरू झाली आणि मंडोळीच्या दिशेने पुढे गेली. तेथे प्राचार्य डॉ. अरुण जाधव यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करून त्यांच्या शौर्य व नेतृत्वाच्या आदर्शांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यात आली.

त्यानंतर सहभागींनी हंगरगाकडे आपला प्रवास सुरू ठेवला.जिथे प्राचार्य डॉ. अरुण जाधव यांनी या रॅलीची सांगता केली. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि फिटनेस, पर्यावरण जागरूकता व राष्ट्र अभिमानाचा संदेश सक्रियपणे पसरवला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सहना यांनी केले.