- शैलेश सदलगी यांची नाविन्यपूर्ण कल्पना
- उष्णतेत कर्तव्य बजावणाऱ्यांना दिलासा
बेळगाव : शहरात उष्णतेची लाट दिवसेंदिवस तीव्र होत असून तापमान ३६ ते ३९ अंश सेल्सिअस दरम्यान पोहोचले आहे. नागरिक हैराण झाले असताना कडक उन्हात रस्त्यावर उभे राहून सेवा देणाऱ्या वाहतूक पोलिसांना दिलासा देणारा एक उपाय समोर आला आहे.
वाहतूक पोलीस शैलेश सदलगी यांनी तयार केलेली ‘सोलर कॅप’ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या कॅपच्या वर सोलर पॅनल बसवण्यात आले असून, सूर्यप्रकाशातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेवर छोटा पंखा चालतो. त्यामुळे डोक्याला सतत हवा मिळत राहून उष्णतेपासून काही प्रमाणात संरक्षण मिळते.
कडक उन्हात दीर्घकाळ कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसाठी हा प्रयोग उपयुक्त ठरत असून, उष्माघाताचा धोका कमी करण्यास मदत होत आहे. शैलेश सदलगी यांच्या या कल्पकतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.








