• भक्तिमय वातावरण

बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात शिवजयंती आणि अक्षय तृतीया निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. यावेळी विशेष रुद्राभिषेक करण्यात आला असून कपिलनाथाच्या पिंडीवर हापूस आंब्यांची आकर्षक आरास साकारण्यात आली होती.

दरवर्षीप्रमाणे यंदाही ही अनोखी आंबा आरास फ्रूट मार्केटमधील प्रसिद्ध आंबा व्यापारी तुषार बर्डे यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली. रंगीबेरंगी आणि आकर्षक सजावटीमुळे मंदिर परिसर भाविकांच्या विशेष आकर्षणाचे केंद्र ठरला.

शिवजयंती आणि परशुराम जयंतीही मंदिरात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कपिलनाथाच्या पिंडीला शिवरायांचे जिरटो परिधान करण्यात आले होते, ज्यामुळे भक्तीभावासोबत ऐतिहासिक अभिमानाचाही संगम अनुभवायला मिळाला. या धार्मिक कार्यक्रमास मंदिराचे ट्रस्टी, सेवेकरी तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.