सुळगा (हिं.) : येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा भक्तीभावाने उत्साही वातावरणात पार पडला. येथील वेंगुर्ला रोड तसेच मारुती गल्लीतील हनुमान मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गुरूवार दि. २ एप्रिल रोजी पहाटे हनुमान मूर्तीला विधीवत अभिषेक घालण्यात येऊन पूजन करण्यात आले. सकाळी ६ वा. हनुमान जन्मोत्सवानिमित्त येथील महिलांनी पाळणागीत गायिले. त्यानंतर दिवसभर भजन कीर्तन यासारखे धार्मिक कार्यक्रम सुरू होते. भक्तांना संपूर्ण दिवसभर तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात आले.
- वेंगुर्ला रोड येथील मारुती मंदिरातर्फे दुपारी महाप्रसाद :
हनुमान जयंतीनिमित्त वेंगुर्ला रोड मारूती मंदिरतर्फे दुपारी १२ वा.पासून गावातील सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. येथील हनुमान सेवक मंडळाने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचे नियोजन केले होते. शेकडो भक्तांनी याचा लाभ घेतला.








