बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाची महत्वपूर्ण बैठक रविवार दि. ५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. रामलिंगखिंड गल्ली येथील जत्तीमठ देवस्थान येथे सायंकाळी ४.३० वा. या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शहर व उपनगरातील सर्व सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी व शिवभक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.