बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावमधील प्रसिद्ध रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी दख्खनचा राजा श्री जोतिबा यांच्या चैत्री यात्रेनिमित्त एक भव्य रांगोळी साकारली आहे. ही रांगोळी सुमारे दोन फूट रुंदी आणि तीन फूट लांबीची आहे. तिच्या तयारीसाठी अंदाजे चौदा तास वेळ लागला असून, लेक कलरचा वापर करून तिचे रंगोळीत सादरीकरण केले आहे.
आधीही या कलाकाराने विठ्ठल-रखुमाई, श्री राम, छत्रपती शिवाजी महाराज, राम मंदिर आणि इतर अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांच्या रांगोळ्या रेखाटल्या आहेत. ही खास रांगोळी ज्योती फोटो स्टुडिओ, वडगाव येथे सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत नागरिकांना पाहता येईल.







