- नामवंत मान्यवरांची लाभणार उपस्थिती
बेळगाव : मुलांमधील सांगीतिक कौशल्याला वाव देण्यासाठी सौ. चंद्रज्योती देसाई यांच्या वतीने ‘हसत-खेळत संगीत शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा भव्य शुभारंभ सोहळा बुधवार, दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता संपन्न होणार आहे.
जी. जी. चिटणीस इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे आयोजित या उद्घाटन सोहळ्याला विख्यात व्यंगचित्रकार श्री. जगदीश कुंटे, भजन सम्राट आणि महाराष्ट्र भूषण श्री. शंकर पाटील, जी. जी. चिटणीस शाळेच्या प्राचार्या श्रीमती नविना शेट्टीगार आणि ज्ञानप्रबोधन शाळेच्या प्राचार्या सौ. मंजिरी रानडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
संगीतासारख्या विषयाची गोडी मुलांमध्ये निर्माण व्हावी आणि त्यांनी आनंदी वातावरणात कला आत्मसात करावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, उद्घाटन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक सौ. चंद्रज्योती देसाई यांनी केले आहे.








